कृती : दुधाला भांड्यात ओतून गरम करत ठेवावे, उकळी आल्यावर त्यात लिंबाचा रस टाकावा. जेव्हा दूध फाटेल तेव्हा त्याचे पाणी काढून घ्यावे व त्याला कपड्याने बांधून अर्ध्या तासासाठी लटकवून ठेवावे. नंतर त्या मिश्रणाला हाताने चांगले चोळून एकजीव करावे. त्यात साखरेचा बुरा, वेलची पूड घालून चांगले कालवावे. आंब्यांचे सालं काढून त्याचे पातळ पातळ काप करावे. आता एक जाडसर पॉलिथीनचा तुकडा घेऊन त्या मिश्रणाला त्यावर पसरावे, वरून आंब्याच्या फोडी टाकाव्या. या मिश्रणाला एका कोपऱ्याने रोल करावे, जेव्हा तो रोल पूर्ण होईल तेव्हा पॉलिथीनच्या तुकड्याला बांधून फ्रीजरमध्ये ठेवावे. कडक झाल्यावर काढावे. त्या रोल ला खोबऱ्याच्या बुऱ्याने गुंडाळून त्याचे लहान लहान काप करून सर्व्ह करावे.