रविवार, 25 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

रसरोटी

कणीक
ND
साहित्य : कणीक, नारळ, साखर.

कृती : नारळ खोवून, खोबरे वाटून व पिळून रस काढावा. नंतर पुन्हा खोबर्‍यात पाणी किंवा दूध घालून, वाटून रस काढावा. हा रस थोडा पातळ निघेल. दोन्ही रस निरनिराळे ठेवावेत. नंतर दोन्ही रस गाळून घेऊन, त्यात ते चांगले गोड होतील, तेवढी साखर घालनू ढवळावे. तेल व मीठ घालून कणीक पाण्याने भिजवावी आणि मळावी व त्याच्या लहान गोळ्या कराव्या. त्यांतील एक गोळी घेऊन ती पिठीवर पुरीएवढी लाटावी व ती तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावी. नंतर ती नारळाच्या पातळ रसात टाकावी, म्हणजे रस ओढून घेईल. याप्रमाणे सर्व रोट्या भरून रसात टाकाव्यात. खाव्यास देताना जाड रसाबरोबर खावयास घाव्यात.