मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. शिक्षक दिन
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (15:08 IST)

शिक्षक महात्म्य

Teacher Mahatmya
घडविले शिल्प गोळ्यातून मातीच्या,
किमयागार असे तू, सर्वांच्या जीवाचा,
 
लहानखोर बोटांत गिरवले अक्षर,
सर्वानाच केलंय तुम्हीच साक्षर,
शिक्षक रुपी ,देव भुमीवरी आले,
परीस स्पर्श अवघा, करुनिया गेले,
 
ह्यापरिस नसे कोणतेच काम
श्रेष्ठ,
तरीही साधेपणा हेच तुमचे वैशिष्ठ,
 
असा नसावा कुणी ज्यास नसेल गुरूकुणी
कशी ऐकेल मग तो
त्यांची अमृतवाणी
 
नमन माझे समस्त शिक्षक वृंदासी,
अमोघ वाणी तुमची ऐकवत राहा मानवासी.!!
 
अश्विनी थत्ते