शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. शिक्षक दिन
Written By

Teacher's Day 2020 Quotes शिक्षक दिनानिमित्त अनमोल विचार

* चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. 
 
* चांगला शिक्षक आम्हाला स्वत:बद्दल विचार करण्यास भाग पडतो.
 
* पुस्तक वाचन आम्हाला एकांतात विचार करण्याची संधी आणि खरं सुख प्रदान करतं.
 
* प्रत्येक घर विश्वविद्यालय आहे आणि पालक शिक्षक आहेत.
 
* आई-वडील केवळ जन्म देतात पण जगायला शिक्षक शिकवतात.
 
* सध्याच्या परिपेक्ष्यात आपला विरोधी आपला श्रेष्ठ शिक्षक ठरु शकतो.
 
* प्रत्येक क्षण काही शिकवणूक देत असतं या प्रकारे तर वेळ आणि अनुभव हे नैसर्गिक शिक्षक आहेत.
 
* समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. 
 
* शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही.
 
* समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे.
 
* एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा.
 
* एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा.