1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 27 मार्च 2024 (08:58 IST)

वास्तु आणि ज्योतिषनुसार रात्री डोक्याजवळ या पाच वस्तूंपैकी ठेवावी एक वस्तू

Remedies to get a restful sleep at night
तुम्हाला जर आरोग्याबद्द्ल कुठलीही समस्या असेल तर किंवा दैनंदिनी जीवनात अपयश येत असल्यास तुम्हाला या पाच वस्तूंपैकी एक वस्तू झोपतांना डोक्याजवळ घेऊन झोपायची आहे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रनुसार असे केल्याने भाग्य उजळते, सौभाग्य आणि आरोग्य मिळते.  
 
1. पाण्याने भरलेला तांब्या- झोपतांना डोक्याजवळ पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा आणि सकाळी ते पाणी झाडांना टाकावे, वॉश बेसिन मध्ये टाकावे किंवा बाहेर टाकावे, असे केल्याने मनाची अशांतता दूर होईल आणि आरोग्य चांगले होईल.  
 
2. सूरी- असे म्हणतात की, जर झोपल्यानंतर एकदम झोपेत दचकायला होत असेल तर भीतिदायक स्वप्न येतात किंवा रात्रीच्या अंधराची भीति वाटत असल्यास अश्यावेळेस उशीखाली सूरी, कातरी किंवा लोखंडाची एखादी वस्तू ठेवावी. 
 
3. लसूण-  लसणाच्या काही पाकळ्या उशीखाली ठेऊन झोपल्यास आजूबाजूला सकारात्मक उर्जेचा संचार होईल आणि चांगली झोप लागण्यास मदत होईल. 
     
4. बडीशोप- उशीखाली बडीशोप ठेऊन झोपल्याने राहुदोष समाप्त होतो. यामुळे वाईट स्वप्न पडत नाही आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळतो.   
 
5. हिरवी वेलची-  झोपतांना उशीखाली हिरवी वेलची घेऊन झोपल्यास वाईट स्वप्न येत नाही व चांगली झोप लागते.     
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी 
संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik