बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (10:49 IST)

वास्तुशास्त्राप्रमाणे मनी प्लांटने होऊ शकतं आर्थिक नुकसान

घरात मनी प्लांट लावल्याने सुख-समृद्धी आणि धन येतं असे मानले आहे. म्हणूनच अनेक लोकं आपल्या घराबाहेर बगीचा नसला तरी घरात मनी प्लांट नक्की लावतात. परंतु वास्तुशास्त्राप्रमाणे जर हे प्लांट योग्य दिशेत लावले नाही तर आर्थिक नुकसान झेलावं लागू शकतं.
 
वास्तू शास्त्रज्ञांप्रमाणे घरात मनी प्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा सर्वोत्तम दिशा आहे. या दिशेत हे झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
 
या दिशेचे दैवत गणपती आणि प्रतिनिधी शुक्र असल्यामुळे मनी प्लांट आग्नेय अर्थात दक्षिण-पूर्वीकडे लावणे योग्य आहे.
 
मनी प्लांट कधीही ईशान अर्थात उत्तर-पूर्वीकडे लावू नये. यासाठी ही दिशा सर्वात नकारात्मक मानली गेली आहे, कारण .ईशान दिशेचा प्रतिनिधी देवगुरु बृहस्पतीला मानले आहेत आणि शुक्र व बृहस्पती यांच्यात शत्रुवत संबंध असतात.
 
ईशान दिशेत तुळस लावू शकता.