बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

पलंगाखाली ठेवू नये या वस्तू

अलीकडे लोकं बॉक्स असलेले बेड खरेदी करतात ज्याने घरातील नियमित कामास न येणारं पुष्कळसं सामान त्यात ठेवता येतं. आणि एकदा का हे बेड बॉक्स घरात असलं की प्रत्येक फालतू वस्तू त्यात टाकली जाते. परंतू बॉक्समध्ये ठेवलेल्या फालतू सामानामुळे नकारात्मकता वाढते. आणि अश्या बेडवर झोपल्याने आपली झोपदेखी पूर्ण होत नाही.
 
या फालतू सामानतून निघाणार्‍या नकारात्मक ऊर्जेमुळे झोपेत वाईट स्वप्न पडतात. म्हणून बेड बॉक्समध्ये केवळ कामाच्या वस्तूच ठेवायला हव्या.
 
बेडखाली जोडे- चपला देखील ठेवू नये. जोडे-चपला बेडरुमच्या बाहेरच ठेवायला पाहिजे. तसेच झोपताना पाय धुऊन झोपावे. याने वाईट स्वप्न पडत नाही.