बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (15:32 IST)

या 10 वास्तुदोषांमुळे पैसा टिकत नाही, माणूस होतो निर्धन

नोकरी आणि व्यवसाय इत्यादी केल्यानंतर आम्ही पैसे तर भरपूर कमावतो पण त्याला टिकवून ठेवायचे आणि त्याला दुप्पट करण्यासाठी आमची धावपळ सुरूच असते. कमावलेले किंवा एकत्र केलेले पैसे घरात टिकवून ठेवणे गरजेचे आहे, यासाठी तुम्हाला घरात वास्तू दोष आहे का? याकडे लक्ष्य देणे फारच गरजेचे आहे. कारण तुम्ही भले लाखो रुपये कमावतं असाल पण त्या पैशांची बचत होत नसेल तर तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही. तर जाणून घ्या त्या 10 वास्तुदोषांबद्दल ज्यामुळे श्रीमंत व्यक्ती देखील कंगाल बनतो  — 
 
1.
जर तुमच्या घरात फार प्रयत्न करून देखील पैसा वाचत नसेल तर सर्वात आधी ईशान कोपर्‍यावर आपली नजर टाकवी. देवाच्या या जागेवर घाण किंवा डस्टबिन ठेवल्याने धन नाश होतो. अशात उत्तर पूर्वीकडे कधीही घाण करू नये आणि या जागेवर जड वस्तू ठेवणे टाळावे.  
 
2.
आमच्याकडे पाणी हे लक्ष्मीचे प्रतीक मानण्यात आले आहे. जर तुमच्या घरात नळांमधून पाणी टपकत असेल आणि पाइप लाइनहून लीकेज असेल तर हे आर्थिक नुकसानीचे संकेत आहे. वास्तूच्या नियमानुसार नळातून पाणी टपकणे अर्थात तुम्ही एकत्र केलेले पैसे हळू हळू खर्च होण्याचे संकेत आहे. या दोषामुळे लक्ष्मी नाराज होऊन जाते.    
 
3.
वस्तूनुसार घरातील मुख्य दाराचा धनाशी संबंध असतो. याच्याशी निगडित वास्तुदोष धन हानीचे संकेत असतात. जर कोणाच्या घराचे मुख्य दार दक्षिण दिशेत असेल तर त्या व्यक्तीला नेहमी आर्थिक त्रास राहतो. या प्रकारे घरातील मुख्य दार तुटलेले असेल किंवा पूर्णपणे उघडत नसेल या वास्तुदोषामुळे देखील धनहानी होते.  
 
4. 
वस्तूनुसार घर बनवताना नेहमी घराच्या ढलान चे विशेष लक्ष्य ठेवायला पाहिजे. जर तुमच्या घराचा उतार उत्तरपूर्वेकडे उंच असेल तर धन जमा होण्यास अडचण येते आणि आयपेक्षा व्यय जास्त होतो. सांगायचे म्हणजे उत्तर-पूर्व दिशेत न फक्त उतार असायला पाहिजे बलकी पाण्याचा निकस देखील याच दिशेत असायला पाहिजे.  
 
5. 
घर बनवताना ईशान्य कोपर्‍यासोबत उत्तर-पश्चिम दिशेत देखील उताराचे विशेष लक्ष्य ठेवायला पाहिजे. जर तुमच्या घराचा उतार उत्तर-पश्चिम दिशेत खाली असेल, तर निश्चित रूपेण तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या वास्तुदोषामुळे घरात बरकत राहत नाही. म्हणायचा अर्थ असा की उत्तर-पश्चिम दिशेचा भाग उंच असायला पाहिजे.  
 
6.
वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये प्रवेश करताना समोरच्या भिंतीचा डावा कोपरा भाग्य आणि संपत्तीचा क्षेत्र असतो. धन आणि समृद्धीची कामना पूर्ण करण्यासाठी या कोपर्‍यात धातूची एखादी वस्तू लटकवून ठेवायला पाहिजे. तसेच या कोपर्‍यात जर भेगा असतील तर त्याला लगेचच भरायला पाहिजे. असे केले नाहीतर धनहानी होते. 
 
7.
यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात धन स्थानाचे विशेष लक्ष्य ठेवायला पाहिजे. तुम्ही तुमचे धन ज्या तिजोरीत ठेवता त्याला दक्षिणच्या भिंतीवर या प्रकारे ठेवाकी त्याचे तोंड उत्तराकडे असायला पाहिजे. जर शक्य नसेल तर पूर्व दिशेकडे तोंड करू शकता. पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे दक्षिण दिशेकडे तिजोरीचे तोंड ठेवल्यास धन टिकत नाही.  
 
8.
पैशांच्या बरकतीसाठी स्वयंपाकघराच्या वास्तूकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे. जर तुमच्या घरात स्वयंपाकघर पश्चिम दिशेकडे असेल तर धनलाभ भरपूर मात्रेत येईल पण बरकत राहणार नाही. म्हणायचे तात्पर्य असे की या दिशेत स्वयंपाक घर असल्यास जातकाजवळ पैसा तर भरपूर येतो पण तो खर्च ही त्याच प्रमाणात होतो.  
 
9.
घरात तुटलेला बेड देखील एक मोठा वास्तुदोष मानला जातो. तुटलेल्या बेडचा वास्तुदोष न फक्त तुमच्या खर्चात वाढ करतो बलकी या दोषामुळे आर्थिक लाभामध्ये देखील कमी येते. या प्रकारे घराच्या छत किंवा पायरीच्या खाली कबाड जमा केल्याने देखील आर्थिक नुकसान होत. 
 
10.
जर पैशांची बरकत हवी असेल तर घरात प्लास्टिकचे फूल आणि पौधे ठेवणे टाळावे. प्लास्टिकचे फूल आणि रोप नकारात्मक ऊर्जा वाढवतात. तसेच शिळे फूल देखील घरात ठेवू नये.