शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तू टिप्स: तुमच्या खोलीत सूर्याची किरण तर मिळतील हे फायदे

संपूर्ण ब्रह्मांडाचा आधार सूर्य आहे. सूर्याच्या ऊर्जेमुळेच पृथ्वीवर जीवन आहे. अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश या पाच तत्त्वांवर वास्तू आधारित आहे. सूर्यदेवाला अग्नीचा स्वरूप मानण्यात आला आहे, म्हणून वास्तू शास्त्रात सूर्याचा विशेष महत्त्व आहे. तर जाणून घेऊ सूर्याशी निगडित काही सोपे वास्तू उपाय जे आमच्या जीवनात नवीन ऊर्जा भरून देतील.  
 
सूर्योदया अगोदर ब्राह्ममुहूर्ताचा वेळ चिंतन-मनन एवं अध्ययनासाठी सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. विद्यार्थी वर्गाला या वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे. ब्राह्ममुहूर्ताचा वेळ असीम ऊर्जेचा भांडार मानला जातो. सूर्योदयावेळेस येणार्‍या किरणा आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मानले गेले आहे. पूर्व दिशेला सूर्याचा निवास स्थान मानला गेला आहे. वास्तुशास्त्रात सूर्योदयाच्या वेळेस घरातील दार आणि खिडक्या उघडे ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो.  
 
असे म्हटले जाते की ज्या घरात सूर्याचा प्रकाश येत नाही, तेथे डॉक्टरांना जावे लागते. अंधार असलेल्या खोलीत जेथे सूर्याची किरण येत नाही, तेथे राहणार्‍या लोकांच्या आरोग्यावर विपरीत प्रभाव पडतो. स्वयंपाकघरात आणि स्नानघरात देखील सूर्याचा प्रकाश पोहोचायला पाहिजे अशी व्यवस्था करायला पाहिजे. घरात कृत्रिम प्रकाशाचा वापर कमीत कमी करायला पाहिजे.