शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (10:52 IST)

भितीदायक स्वप्नांपासून मुक्ती हवी असेल तर ह्या वास्तू टिप्सचा वापर करा

झोपेत काही स्वप्न तुम्हाला आवडतात आणि आपण त्याला लक्षात ठेवतो. पण काही भितीदायक स्वप्न बघितले तर तुम्हाला अस वाटू लागत की हे आपल्यासोबतच होत आहे आणि तुम्ही घाबरून जाता. बरेच लोक भितीदायक स्वप्न बघतात आणि घाबरून उठून बसतात. आणि ही समस्या एक वेळाच नव्हे तर सारखी सारखी होत असेल तर ही मोठी समस्येचे रूप धारण करून घेते. आज तुम्हाला असे काही वास्तू टिप्स देत आहे ज्याने तुम्ही भितीदायक स्वप्नांपासून मुक्त होऊ शकता.  
 
आपल्या डोक्याशी चाकू ठेवून झोपा   
तुम्हाला सांगायचे म्हणजे वास्तूप्रमाणे जर तुम्हाला भितीदायक स्वप्न येत असतील तर रात्री झोपण्याअगोदर आपल्या डोक्याशी एक चाकू ठेवायला पाहिजे.  जर तुमच्याजवळ चाकू नसेल तर एखादी लोखंडाची धारदार वास्तू ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला या भितीदायक स्वप्नांपासून सुटकारा मिळेल.  
 
पिवळे तांदूळ ठेवावे 
तुम्हाला जर रात्री भितीदायक स्वप्न येत असतील तर तुम्हाला डोक्याखाली पिवळे तांदूळ ठेवून झोपायला पाहिजे. जर तुम्हाला तांदुळाला पिवळे करायचे असेल तर तुम्हाला हळदीचा वापर करावा लागेल. असे केल्याने तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येणार नाही. 
 
छोटी वेलची देखील असते फायदेशीर   
जर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येतात तर तुम्हाला घाबरायला नाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला रात्री झोपण्याअगोदर एका कपड्यात लहान वेलची बांधून उशी खाली ठेवायची आहे. वस्तूप्रमाणे असे केल्याने तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येणे बंद होऊन झोपही चांगली लागते.  
 
तांब्याच्या भांड्यात ठेवा पाणी   
बर्‍याच वेळा असे बघण्यात येत की वाईट स्वप्न तुम्हाला आले नाही तरी तुम्ही झोपेत घाबरून उठता. असे तुमच्याबरोबर नेहमी होत असेल तर तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरून आपल्या पलंगाखाली ठेवायला पाहिजे आणि सकाळी उठून ते पाणी कुंड्यात टाकून द्यावे. असे केल्याने तुमची ही समस्या   लवकरच दूर होईल आणि तुम्हाला वाईट स्वप्न येणार नाही.  
 
जोडे चपला ठेवू नये  
जर तुमची सवय असेल की रात्री झोपताना तुम्ही तुमचे जोडे चपला आपल्या बिछान्याच्या खाली ठेवत असाल तर हे ठेवणे ताबडतोब बंद करा कारण वाईट स्वप्न येण्याचे हे एक कारण असू शकत.   
बिछाना स्वच्छ करून झोपा      
जर तुम्हाला रात्री स्वप्न येत असतील आणि कदाचित तुम्ही बिछान्याला स्वच्छ करून झोपत नसाल तरी देखील वाईट स्वप्न येतात. झोपण्याअगोदर पाय धुऊन झोपावे.  
 
महिलांनी केस बांधून झोपू नये 
जर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येत असतील आणि तुम्ही महिला असाल तर  लक्षात ठेवा की तुम्हाला रात्री केस मोकळे करून झोपायचे आहे. जर तुम्ही केस बांधून झोपत असाल तर तुम्हाला बर्‍याच प्रकारच्या समस्यांना पुढे जावे लागेल. वास्तूत असे करण्याची मनाई आहे.