शनिवार, 13 डिसेंबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 मार्च 2019 (15:58 IST)

घराचे मुख्य गेट काळ्या रंगाचे असेल तर होऊ शकतं नुकसान

vaastu tips
वास्तुशास्त्रात घरात ठेवण्यात आलेल्या वस्तूंची देखील आपली एक दिशा असते. असे म्हणतात की आम्ही ज्या जागेवर घराचे सामान ठेवतो त्याचा प्रभाव आमच्या जीवनावर देखील पडतो. काही घरांमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून वाद विवाद सुरूच असतात किंवा घरातील लोक आजारी असतात. या सर्व गोष्टींचे कारण वास्तुदोष असू शकतात. आम्ही तुम्हाला असे 5 वास्तू दोष सांगत आहोत ज्यामुळे घरात नेहमी अशांतीचे वातावरण निर्मित होते.
 
1. वास्तुशास्त्रा प्रमाणे घराचे मेनं गेट घरातील इतर दरांपेक्षा मोठे असायला पाहिजे. जर मेनं गेट दुसर्‍या दारांपेक्षा लहान असेल तर पैशांशी निगडित समस्या येऊ शकतात.
 
2. सूर्योदयाच्या वेळेस घरातील खिडक्या नेहमी उघड्या ठेवायला पाहिजे. यामुळे पॉझिटिव्ह अॅनर्जी घरात प्रवेश करते.
 
3. घराचा मुख्य दरवाजा काळ्या रंगाचा नसावा. वास्तूनुसार यामुळे कुटुंबातील मुख्य व्यक्तीला धोका, अपमान आणि सतत नुकसान होण्याची शक्यता असते.
 
4. घराच्या दारामागे कुठल्याही प्रकारचे शस्त्र किंवा दंडा इत्यादी नाही ठेवायला पाहिजे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये विवादाची स्थिती निर्मित होते.
 
5. घरातील कोणत्याही बेडरूममध्ये वॉश बेसिन नसावे. यामुळे लव्ह लाईफमध्ये अडचणी येतात.