मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जुलै 2019 (14:54 IST)

वास्तु शास्त्रानुसार बेडरुममध्ये नको फ्लॉवर पॉट आणि अॅक्वेरियम

वास्तुशास्त्रानुसार दांपत्य जीवनात चढ उतार येण्याचे एक मुख्य कारण बेडरुममध्ये ठेवलेल्या वस्तू देखील आहे. बेडरूममध्ये ठेवलेले अॅक्वेरियम आणि काही खास फोटोंमुळे दांपत्य जीवनात तणाव वाढतो. वास्तुनुसार बेडरूममध्ये अॅक्वेरियम, हनुमान आणि महादेवाचे फोटो देखील नाही लावायला पाहिजे. यांच्यामुळे दांपत्य जीवनात अडचणी निर्माण होतात.  
 
अॅक्वेरियममुळे आरोग्यावर पडतो अशुभ प्रभाव
अॅक्वेरियमला बेडरूममध्ये नाही ठेवायला पाहिजे. यामुळे दांपत्य संबंधांमध्ये तणाव वाढतो. तसेच नवरा बायकोच्या आरोग्यावर देखील अशुभ प्रभाव पडतो. अॅक्वेरियमला घराच्या बैठकीत अशा प्रकारे ठेवायला पाहिजे की जेव्हा गृहस्वामी बैठकीत उभे राहून बाहेर मुख्य दाराकडे बघेल तेव्हा अॅक्वेरियम प्रवेश दाराच्या डावीकडे ठेवलेला असला पाहिजे.  
 
फ्लॉवर पॉटमुळे वाढतो दुरावा  
चुकीच्या जागेवर ठेवलेला फ्लॉवर पॉट बर्‍याचवेळा तुमच्यासाठी चांगला नसतो आणि जर तुम्ही त्याची जागा बदलली तर तो तुमचे मोठे मोठे काम सोपे करून देतो. बेडरूम मध्ये कुठल्याही प्रकारचा पौधा लावू नये. याचा वाईट परिणाम वैवाहिक जीवनावर पडू शकतो. यामुळे नवरा बायकोत दुरावा येऊ लागतो. बोन्साई झाड देखील घरात नाही ठेवायला पाहिजे. वास्तुनुसार बोनसाई झाड घरात राहणार्‍यांची आर्थिक प्रगती रोखतात.  
 
बेडरूममध्ये हनुमानाचे फोटो नको  
हनुमानाचे फोटो लावताना या गोष्टींचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे की यांचे फोटो किंवा मूर्ती आपल्या बेडरूममध्ये नाही लावायला पाहिजे, कारण हनुमान बाल ब्रम्हचारी आहे. वास्तु शास्त्रात असे मानले जाते की हनुमानाचे बळ दक्षिण दिशेत जास्त असत, म्हणून याला दक्षिण दिशेत लावायला पाहिजे, पण बेडरुममध्ये नको.