सर्व 12 राशींच्या लोकांसाठी कसे असते फळ देतात दक्षिण मुखी घर
वस्तूनुसार दक्षिण दिशा ही घरासाठी अशुभ मानली जाते, पण ही दिशा सर्वांसाठी अशुभ नसते, काही लोकांना या दिशेमुळे फायदा देखील होऊ शकतो. ज्या लोकांना दक्षिण दिशा अशुभ असते, त्यांनी घरात वास्तुदोष नाशक यंत्र ठेवायला पाहिजे. येथे जाणून घ्या सर्व 12 राशीच्या लोकांसाठी दक्षिण दिशेचे घर कशा प्रकारे फळ देईल ...
सर्व 12 राशीच्या लोकांना दक्षिण दिशेच्या घराचे फळ
जर तुमची मेष राशी असेल तर दक्षिण मुखी भवन किंवा प्लाट तुमच्यासाठी फारच शुभ आहे. येथे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल.
वृषभ राशीच्या लोकांना दक्षिण मुखी भवन अशुभ फळ देणारे आहे. या दिशेत राहिल्याने आय पेक्षा खर्चे जास्त होतात.
मिथुन राशीच्या लोकांना या दिशेत अशुभ फळ मिळतात. अशा भवनात राहिल्याने त्यांना गंभीर आजार होण्याची भिती असते.
कर्क राशीच्या लोकांसाठी दक्षिण मुखी भवन शुभ फल देणारा ठरतो. या घरात राहिल्याने व्यक्तीला मान सन्मान आणि नोकरीत बढती मिळते.
सिंह राशीच्या लोकांना दक्षिण मुखी भवन भाग्योदय कारक आहे. अशा लोकांना एकापेक्षा जास्त भवनाची प्राप्ती होऊ शकते.
कन्या राशीच्या लोकांना अशा भवनात जे दक्षिण मुखी असेल, तेथे राहणे टाळावे. या लोकांसाठी हे घर त्रास वाढवणारे असू शकते.
तुला राशीच्या लोकांसाठी दक्षिण दिशेचे घर मध्यम फळ देणारे असते.
वृश्चिक राशीसाठी दक्षिण मुखी भवन चांगले असते. यांना मान सन्मान आणि आत्मबळ मिळत राहत.
धनू राशीच्या लोकांसाठी ही दिशा संतानच्या दृष्टीने लाभदायक आहे. या दिशेत घर असेल तर व्यक्तीची संतानं उच्च शिक्षा प्राप्त करते.
मकर राशीसाठी दक्षिण दिशेचे भवन धन संबंधी कामांमध्ये फायदा करवून देतो पण व्यक्तीचा विकास होत नाही.
कुंभ राशी असणार्या लोकांना या दिशेचे घर संघर्ष वाढवणारे असतात.
मीन राशीसाठी दक्षिण मुखी घर भाग्याचा साथ देणारा असतो.