शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2019 (11:34 IST)

जेवताना लक्षात ठेवण्यासारखे काही नियम

जेवताना एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवावी की अन्नाचा आपल्या शरीराला पूर्ण फायदा मिळेल. आरोग्य बिघडवणारी कुठलीही गोष्ट खाऊ नये. पण यांचबरोबर जेवताना आपल्या आसपासचं वातावरणही शुद्ध असावं.
 
शास्त्रांनुसार जर आपण जेवत असताना एखादा कुत्रा आपल्या समोर येऊन उभा राहिला आणि आपल्या अन्नाके बघत बसला तर ते अन्न खाऊ नये. कुत्र्याच्या आधाशी नजरेमुळे अन्न अपवित्र होतं. असं अन्न जेवल्यास ते नीट पचत नाही. कुत्रा अन्नाकडे बघत असल्यास ते संपूर्ण अन्न कुत्र्यलाच खायला घालावं. यामुळए अन्न वाया जाणार नाही आणि कुत्र्याला अन्नदान केल्याचं पुण्यही मिळेल. 
 
जेवणाच्या जागेवर कुठलाही कचरा, घाण असू नये. अशुद्ध जागेवर भोजन केल्यास अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. जेवणातील पदार्थांइतकंच आपल्या भोजनाचं स्थानही महत्वाचं असतं. ते पवित्र असावं. कारण शास्त्रानुसार अन्नग्रहण हा एक प्रकारचा यज्ञ आहे.