देवघरात या वस्तू ठेवल्यास घरात होतो कलह
Puja ghar vastu : घरातील देवघर हे घरातील महत्वपूर्ण भाग आहे. देवघरात काय ठेवावे आणि काय ठेवू नये. हे नियममध्ये येते. जर तुम्ही चुकीची वस्तू देवघरात ठेवली तर यामुळे घरात कलह होतात अशांती निर्माण होते. मानसिक तणाव निर्माण होऊन आर्थिक प्रगती थांबते. तर चला जाणून घेऊ या देवघरात काय ठेऊ नये.
खंडित मूर्ती किंवा चित्र- जर देवघरात खंडित मूर्ती ठेवली असले तर, ती लगेच काढून टाका. खंडित मूर्ती शुभ मानली जात नाही. तसेच अनेक मूर्ती देखील देवघरात ठेऊ नये. आपल्या इष्टदेवाची मूर्ती ठेवली तरी चालते. जास्त मूर्ती ठेवल्यास दैनंदिन कामे बिघडतात. तसेच अंगठयापेक्षा मोठे शिवलिंग ठेऊ नये.यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा वास निर्माण होतो. देवघरात पंचदेवांची मूर्ती ठेऊ शकतात. गणेश, शिव, विष्णु, दुर्गा आणि सूर्य.
रौद्र रूप असलेले चित्र- कोणत्याही देव आणि देवीचा रौद्र रूप असलेला फोटो देवघरात ठेऊ नये. किंवा घरात देखील लावू नये. याला अनिष्टकारी मानले जाते. जसे की, माता कालीचे रौद्र रूप, हनुमानजीचे रौद्र रूप किंवा नटराजची मूर्ति असेल तर काढून टाकावी. सौम्य रूप असलेला फोटो लावू शकतात.
एका पेक्षा जास्त शंख- देवघरात एका पेक्षा जास्त शंख ठेऊ नये. जास्त शंख असतील तर अशुभ मानले जाते. तसेच खंडित शंख देखील ठेऊ नये. एकच ठेवावा बाकी सर्वांना नदीमध्ये प्रवाहित करू शकतात.
फाटलेली धार्मिक पुस्तके- तसेच देघरात किंवा घरात फाटलेली धार्मिक पुस्तके देखील ठेऊ नये.
निर्माल्य- निर्माल्यमध्ये शिळे फुले, हार किंवा अनुपयोगी पूजा साहित्य येते. यानं देखील लागलीच विसर्जित करावे, नाही केल्यास घरात नकारात्म ऊर्जा वास करते.
पितरांचे फोटो- जर तुम्ही देवदेवतांच्या फोटोंशेजारी गेलेल्या लोकांचे म्हणजेच पितरांचे फोटो लावले असतील तर लागलीच काढावे, यामुळे देवदेवता नाराज होतात. व घरात कलह निर्माण होतो.
काडेपेटी- देवघरात काडेपेटी ठेऊ नये. यामुळे घरामध्ये कलह निर्माण होतात.
धारदार वस्तू- वास्तुशास्त्र अनुसार देवघरात धारदार वस्तू ठेऊ नये जसे की सूरी, कातरी इत्यादी वस्तू ठेवल्यास घरात कलह निर्माण होतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
Edited By- Dhanashri Naik