शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2019 (12:37 IST)

वास्तूनुसार योग्य दिशेत लावा विजेचे उपकरण

घरांमध्ये विजेचे उपकरण आम्ही आपल्या सोयीनुसार लावतो. जर यांना अनुकूल दिशेत लावण्यात आले तर जीवनात समाधान राहते आणि आरोग्यावर देखील याचे प्रतिकूल प्रभाव पडत नाही. मग ते विजेचे मीटर असो किंवा फ्रीज, वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर टीव्ही किंवा विजेचे इतर उपकरण, यांना लोक आपल्या सुविधेनुसार घरात जागा देतात. पण वास्तू म्हणतो की जर यांना योग्य दिशेत स्थान दिले तर जीवनात अधिक सुविधा राहते.   
 
ज्या प्रकारे ईशान्य कोपरा आणि उत्तर-पूर्व दिशेचा संबंध आर्थिक समृद्धीशी निगडित असतो तसेच आग्नेय कोण अर्थात दक्षिण-पूर्व दिशेचा संबंध आरोग्याशी निगडित असतो. अग्नी तत्त्वाचा प्रतिनिधित्व करणारी ही दिशा विजेचे उपकरण ठेवण्यासाठी सर्वोचित समजली जाते. घरात प्रवेश बनवण्यासाठी किंवा बोरवैल आणि शयन-कक्ष बनवण्यासाठी ज्या प्रकारे आम्ही वास्तूच्या नियमांचे अनुसरणं करतो, त्याच प्रकारे विजेच्या उपकरणांना स्थापित करण्यासाठी वास्तू सिद्धान्तांकडे लक्ष ठेवणे फारच गरजेचे आहे.    
वास्तूनुसार उत्तर-पूर्वेनंतर दक्षिण-पूर्व दिशांचे महत्त्व आहे. या कोपर्‍याला वास्तुदोषांपासून मुक्त ठेवणे आवश्यक आहे. ही दिशा अग्नी तत्त्वाची जागा आहे. म्हणून विजेचे सर्व उपकरण आणि मीटर, विजेचे नियंत्रण आणि वितरण येथूनच असायला पाहिजे. ज्याने अग्नी तत्त्वाचे संतुलन कायम ठेवू शकतो.   
 
अग्नी तत्त्वाचे असंतुलित होणे बर्‍याच प्रकारच्या आजारांना आमंत्रण देतो. जर या दोषांचे निवारण नाही केले तर बर्‍याचवेळा साधारण आजारपण देखील गंभीर रूप घेऊ शकतो आणि कुटुंबातील सदस्यांना असहनीय त्रास सहन करावा लागतो. विजेचे उपकरण जसे इनवर्टर, ट्रांसफार्मर, फ्रीज इत्यादी उष्मा अर्थात हीट उत्पन्न करतात, म्हणून वास्तुशास्त्रात यांच्यासाठी आग्नेय कोण अर्थात दक्षिण-पूर्वे दिशा योग्य मानली गेली आहे. स्वयंपाकघरासाठी देखील ही दिशा उपयुक्त मानली गेली आहे. तर जाणून घेऊ आग्नेय कोपर्‍याशी निगडित सामान्य वास्तू दोष आणि त्याच्या निवारणाचे उपाय- 
 
जर एखाद्या व्यक्ती या दिशेच्या चुकीच्या प्रयोगामुळे वास्तू दोषाने ग्रस्त घरात राहत असेल तर खाली दिलेले उपायांचा वापर करून त्या दोषांच्या नकारात्मक प्रभावाने तो मुक्त होऊ शकतो.   
 
- अग्नी तत्त्वाच्या असंतुलनामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यासंबंधी त्रास, वैवाहिक आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. या त्रासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी अग्नी तत्त्वाला शांत करणे आवश्यक असते. त्यासाठी दक्षिण-पूर्व कोपर्‍यात सरसोच्या तेलाचा दिवा लावायला पाहिजे.
- सूर्योदयाच्या वेळेस दक्षिण-पूर्व कोपर्‍यात पूर्वेकडे तोंड करून गायत्री मंत्राचा जप केल्याने देखील फायदा होतो.
- घराच्या सर्व खोल्यांमध्ये या दिशेला नियंत्रित ठेवून घराच्या दक्षिण-पूर्व कोपर्‍यात उपस्थित वास्तू दोषाचे निवारण करण्यात येतो. वॉशिंग मशीन, फ्रीज इत्यादींना दक्षिण-पूर्व कोपर्‍यात ठेवल्याने देखील वास्तू दोष दूर होऊ शकतो.