बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (10:31 IST)

भाग्योदयासाठी वास्तुशास्त्राप्रमाणे हे करून बघा, नक्की फायदा होईल

'वास्तू' म्हणजे असे घर वा इमारत जेथे राहणारे लोक सुखी, आरोग्यवान व संपत्ती राखून असणारे असा आहे. त्यामुळेच वास्तुशास्त्रात आमच्या पूर्वजांनी घऱात शांतता रहाण्यासाठी अनेक उपाय सुचविले आहेत.
 
1. घरात तयार केलेल्या स्वयंपाकातील प्रत्येक प्रकारचे थोडेसे अन्न एका थाळीत वेगळे काढून हात जोडून वास्तुदेवाला अर्पित केले पाहिजे. त्यानंतर घरच्यांनी जेवण केले पाहिजे. असे केल्याने वास्तुदेवता त्या घरावर नेहमी प्रसन्न राहते. वेगळे ठेवलेले अन्न नंतर गायीला द्यावे.
2. घरात तूटफूट झालेली यंत्रे ठेवू नयेत. ती घराच्या बाहेर काढून द्यायला पाहिजे. जर ती घरात ठेवली तर घऱच्यांना मानसिक अशांतता किंवा आजारपणाला तोंड द्यावे लागते.
3. ज्या घरात एका पायाचा पाट असतो, तेथे नेहमी पैशांची चणचण असते. घरातले लोक मानसिक व्याधींनी ‍त्रस्त राहातात. त्यासाठी घरात एका पायाचा पाट ठेवू नये.
4. घरातल्या केरसुणी (झाडू) कधीही उभी ठेवू नये. जेथे पाय लागतील किंवा ओलांडावे लागेल, अशा ठिकाणीही केरसुणी ठेवू नका. तशी ठेवल्यास घरात पैसा टिकत नाही.
5. घरातल्या देवालयात तीन गणपती ठेवू नका. जर असेल तर त्यातील एकाला विसर्जित करून द्या किंवा दुसर्‍या ठिकाणी ठेवून द्या. तीन गणपती असतील तर त्या घरात कायमची अशांती राहते. त्या प्रकारे 3 देवींना किंवा 2 शंखांसुद्धा एकत्र पूजाघरात ठेवणे वर्जित आहे.
6. घरातल्या ईशान्य भागात कोणताही पाळीव पशू ठेवू नका. कुत्रे, कोंबडे व म्हैस यांच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा घरात अशांती पसरते.
7. प्रत्येक घरात तुळस, सीताफळ, अशोक, आवळा, हरश्रृंगार, अमलतास, निरगुडी या पैकी किमान 2 झाडे अवश्य लावावीत. या झाडांमुळे घरात सुख शांती नांदते.
8. घरात नेमाने देवाचे पूजन करावे. पूजा करणार्‍या व्यक्तीचे तोंड सदैव पूर्व किंवा उत्तरेकडे असावे. घरात दररोज तूपाचा दिवा लावावा.
9. घराच्या प्रत्येक खोलीचे दिवे एकाच वेळी लावावे. अर्थात प्रत्येक खोलीत प्रकाश पडणे आवश्यक आहे.
 
वरील उपाय केले तर घरातील व्याधी दूर होऊन घरातल्यांना सुख शांती मिळेल व त्यांचा भाग्योदयसुद्धा लवकरच होईल.