Vastudosh, Vastushatra, Jyotishshatra, Astrology | वास्तुदोष निवारणाचे उपाय
घरात वास्तुदोष आहे, असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोड-फोड करताना दिसतात. परंतु तसे केल्याने वास्तुदोष नाहीसे होत नाहीत. हा आपला गैर समज असतो. तो आधी मनातून काढून टाकायला हवा. खालील उपाय तुम्ही वापरून वास्तुदोष मुक्त होऊ शकतात.
* आपल्याला आवडीच्या सुगंधित फूलांचा गुच्छ नेहमी आपल्या बेडरूममध्ये डोक्याच्या बाजूच्या कोपर्यात ठेवावे.
* आपल्या शयनकक्षात खरगटी भांडी ठेऊ नये, कारण घरातील महिलांची वारंवार प्रकृती बिघडत असते.
* कुटूंबात कोणाला भयानक स्वप्न पडत असतील तर झोपताना डोक्याशी गंगाजल ठेवावे.
* घरातील पुरूष हे नेहमी मानसिक तणावग्रस्त असतील तर घरात तुपाचा दीवा लावून गुलाब अगरबत्ती लावावी.
* शयनकक्षात झाडू नये. जर घरात नेहमी वादविवाद होत असतील तर उशी जवळ लाल चंदन ठेऊन झोपावे.
* दुकानदारीत मन लागत नसेल तर मुख्याद्वारच्या मागे किंवा पुढे श्वेत गणपतीची मूर्तीची विधिवत स्थापना करावी.
* घरातील जिन्याखाली बसून महत्त्वपूर्ण कार्य करू नये.
* दुकान, फॅक्टरी, कार्यालय आदी ठिकाणी वर्षांतून एकदा तरी पूजा अवश्य करावी.
* नवीन जागी मन रमत नसेल, कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घरातील दारा खिडक्यांना पिवळ्या रंगाचे पडदे लावावेत.
* घराला लागून असलेल्या घराच्या छतावर हळद थिंपळावी व ब्राम्हणास पिवळे वस्त्र दान करावे.
