गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 4 सप्टेंबर 2017 (16:14 IST)

या देवांची पूजा केल्याने दूर होतो वास्तुदोष, असे ठेवा देवघरात मुरत्या

घरात जर वास्तुदोष असेल तर याची नकारात्मक ऊर्जा आमच्या जीवनाला प्रभावित करू लागते. कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे आरोग्य सतत खराब राहत असेल, किंवा कुटुंबातील लोकांशी वाद विवाद होत असतील तर, होऊ शकत की तुमच्या घरात वास्तू दोष असेल. अशात काही सोप्या उपायांमुळे तुम्ही वास्तुदोष दूर करू शकता.  
 
कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष गणपतीची पूजा केल्यानं दूर होतो. घराला नेहमी स्वच्छ ठेवावे, असे केल्याने घरात सुख शांतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत मिळते. 
 
घरातील देवघरातील देवांच्या मुरत्या अशा प्रकारे ठेवाव्या की त्यांच्या मागचा भाग दिसू नये. देवाची पाठ दिसणे शुभ नसते. देवघरात एकाच देवाच्या दोन मुरत्या नाही ठेवाव्या. जर दोन्ही मुरत्या अमोर समोर ठेवल्या तर कुटुंबात विवादाची स्थिती निर्माण होते.  
 
घरातील प्रवेश दारात गणपतीची मूर्ती लावावी. घरातील मेन गेटवर कॅलेंडर किंवा घड्याळ नाही लावावी. देवाच्या अशा मुरत्यांचे दर्शन नाही करायला पाहिजे ज्यात युद्ध किंवा विनाश करताना दिसतील. खंडित मूर्तीचे दर्शन नाही करायला पाहिजे. प्रयत्न करावे की घराचे वातावरण कधीही खराब नाही व्हायला पाहिजे जसे आरडा ओरडा करण्याची वेळ नाही यायला पाहिजे. झोपताना तुमचं डोकं दाराकडे नसावे.