सोमवार, 17 नोव्हेंबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (23:00 IST)

Vastu Tips : नवीन वर्षात समृद्धीसाठी करा या 5 वास्तु टिप्स

vastu-tips-adopt-these-5-vastu-tips-in-the-new-year for happiness-and-prosperity
घरातील सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा मुख्य दरवाजातून येतात. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आणि राहणाऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावा.
कुबेर उत्तरेला राहतात, त्यामुळे या दिशेला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कुबेराची मूर्ती उत्तर दिशेला ठेवल्याने तुम्हाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. 
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी पूर्व दिशेला झाडे लावा. नवीन वर्षाच्या दिवशी झाडांना पाणी दिल्याने संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये बंधुभाव टिकून राहतो.
घरामध्ये धन-समृद्धीसाठी उत्तर दिशा खूप महत्त्वाची मानली जाते. या दिशेला कधीही फाटलेले कपडे, कचरा आणि तुटलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नका. 
वास्तुशास्त्रानुसार नववर्षाच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात पूजा केल्यानंतर घरभर गंगाजल शिंपडावे. या दिवशी देवघरात शंख अवश्य ठेवावा. असे केल्याने घरात सुख-शांती राहते, असे मानले जाते.