1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 14 मे 2024 (08:54 IST)

Vastu Tips : व्यवसायात भरभराट होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

Shops - Vastu
व्यवसाय हा व्यवस्थित चालला तर तो तुम्हाला लखपति, करोडपति बनवतो. अनेकदा  तुम्ही दिवस-रात्र मेहनत करतात. तरीपण तुम्हाला यश मिळत नाही याची खूप कारणे असू शकतात. या मध्ये वास्तुदोष हे एक कारण असू शकते. या सर्व समस्यांपासून मुक्ति मिळण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहे. 
 
व्यवसायात जर भरभराट हवी असेल तर तुमचे ऑफिस किंवा दुकान ईशान्य कोन(उत्तर-पूर्व) या दिशेला रिकामे ठेवा. तसेच देवघर ईशान्य कोणात ठेवावे. ईशान्य दिशेची स्वच्छता  ग्राहकांना आकर्षित करते. त्यामुळे या दिशेला स्वच्छता ठेवावी. चपला -बूट ईशान्य दिशेला काढू नये कारण असे केल्यास व्यवसायात नुकसान संभवते.
 
वास्तुशास्त्रानुसार ऑफिस मध्ये भिंतीकडे पाठ करून बसणे शुभ मानले जाते. भिंतीवर डोंगर असलेले फोटो लावणे आणि अशा ठिकाणी बसणे जिथे रिकामी जागा असेल. यामुळे तुमच्या मनात नविन आणि मोकळ्या विचारांचा संचार होईल. 
 
जर तुमचा स्वतःचा  व्यवसाय असेल तर, त्या व्यवसाय संबंधित सामानाला उत्तर-पश्चिम दिशेला ठेवल्याने तुमच्या वस्तुंची विक्री वाढेल. आपल्या व्यवसाय वाढण्यासाठी हे लक्षात ठेवा की बाथरूम जवळ सीट नको वास्तुनुसार, हे अशुभ मानले जाते. यासोबतच कधीपण आपल्या ऑफिस किंवा व्यवसाय-स्थळावर मुख्य दरवाजाकडे पाठ करून बसू नये. ऑफिस मध्ये अंडाकृति, गोलाकार, आणि वाकडे-तिकडे आकार असलेले धातु पासून बनलेले फर्नीचर नसावे. लाकडाचा फर्नीचरचा आकार गोलाकार किंवा आयतकार असावा. 
 
भगवान शंकर आणि त्यांचाशी संबंधित वस्तुच्या माध्यमाने आपण आपल्या व्यवसायाशी जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान करू शकतो. आपले ऑफिस किंवा दुकान यांना नकारात्मक ऊर्जे पासून दूर ठेवण्यासाठी ऑफिस किंवा दुकानाच्या मुख्य दरवाजावर लाल किंवा सिंदूरी रंगाने ॐ चिन्ह बनवणे. तसेच निळा रंग भगवान शंकरांचा प्रिय रंग मानला जातो. यासाठी ऑफिस किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला निळ्या रंगाचे ताजे फूल ठेवावे.