सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तूप्रमाणे असे असावे घराचे दार

कोणत्याही घरात त्याच्या मुख्य दाराचे विशेष महत्त्व असतं कारण त्या दाराने सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी काही वास्तू नियम पाळणे आवश्यक आहे.
वास्तू शास्त्राप्रमाणे घरातील दार उघडताना किंवा बंद करताना त्यातून आवाज येणे योग्य नाही. दारातून आवाज येत असल्यास ते लगेच दुरुस्त करवावे.
 
घरातील मुख्य दार नेहमी आतल्या बाजूला उघडले पाहिजे. दार बाहेरच्या बाजूला उघडत असल्यास घरात धन टिकत नाही आणि खर्चही वाढतं.
 
दार जमिनीवर रगड घात उघडत असल्यास आर्थिक संघर्षाला सामोरं जावं लागतं.
 
घरातील मुख्य दारावर झाड, खांब आणि इतर कुठल्याही वस्तूची सावली पडता कामा नये. याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नसतो.
 
दाराजवळ डस्टबिन, रद्दी किंवा फालतू वस्तू ठेवू नये. हे सर्वात मोठे वास्तू दोष मानले गेले आहे. याने धनहानी होते.