मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (19:40 IST)

वास्तू टिप्स : घरात नेहमी या 6 वस्तू ठेवल्यानं बरकत होते

वास्तू शास्त्रात घरात सुख आणि समृद्धी बद्दल बऱ्याच गोष्टीचा उल्लेख केला आहे. वास्तू विज्ञानाच्या मते, जर आपण काही वस्तूंना आपल्या घरात ठेवले तर त्या वस्तू घरातील सुख आणि शांतीत अडथळा आणू  शकतात. तसेच घरात काही गोष्टी ठेवल्यानं सुख, समृद्धी आणि शांती मिळते.
 
1 पाण्याची टाकी -
 वास्तू शास्त्रानुसार पाण्याची टाकी घराच्या छतावर पश्चिम दिशेला ठेवावी. या मुळे घरात शुभता येते आणि काही त्रास होत नाही. कुटुंबातील सदस्यां मध्ये प्रेम वाढत आणि आर्थिक स्थिती बळकट होते.
 
2 धातूचे मासे आणि कासव ठेवणे- 
वास्तू विज्ञानामध्ये असं सांगितलं आहे की घराच्या अडचणींना दूर करायचे असल्यास धातूचे मासे आणि कासव घरात ठेवावं. हे घरात ठेवणं शुभ आहे. या मुळे घरात पैसे येतात आणि दारिद्र्य दूर होत.
 
3  घरात लक्ष्मीची मूर्ती असावी - 
लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे. घराच्या उत्तर दिशेला लक्ष्मीचे असे चित्र लावा ज्यामध्ये ती कमळावर बसलेली असून हातातून सोन्याचे नाणे पडत आहे. वास्तू विज्ञानानुसार हे चित्र लावल्यानं घरात समृद्धी आणि भरभराट येते तसेच आई लक्ष्मीची कृपा नेहमी आपल्यावर राहते.
 
4 पाण्याने भरलेले माठ ठेवा- 
वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेने पाण्याने भरलेला माठ किंवा सुरई ठेवले तर कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. पण हे लक्षात ठेवा की माठ किंवा सुरई नेहमी पाण्याने भरलेले ठेवा. रिकामे ठेवायचे नाही.
 
5 पोपटाचे चित्र लावा- घरात मुलं शिकत असतील तर घरात पोपटाचे चित्र उत्तर दिशेला लावल्याने त्यांच्या वर चांगला परिणाम होईल हे पोपटाचे चित्र अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी फायदेशीर आहे.   
 
6 धातूचा पिरॅमिड असावा- 
घरात चांदी,पितळ किंवा तांब्याने बनलेला पिरॅमिड ठेवणं सोपं आहे. या मुळे घरात बरकत येते. पिरॅमिड अशा ठिकाणी ठेवा जिथे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जास्त वेळ घालवतात.