बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (18:45 IST)

वास्तुशास्त्रानुसार अशा 7 चुका करू नका पैसा राहत नाही

बऱ्याच वेळा आपण सर्वजण एक गोष्ट अनुभवतो की अचानक कमावलेले पैसे निरुपयोगी खर्च होतात, वाचत नाही. कोणाला कर्ज देणे किंवा आजारपणात पैसे खर्च होतात. या शिवाय घरात अशांतता, वाद विवाद, भांडण आणि नकारात्मकता वाढू लागते. काम बिघडू लागतात. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. वास्तुशास्त्रात अचानक वाढ होणाऱ्या अशा घटना वास्तू दोषांमुळे होतात. वास्तू दोषांमुळे पैसे टिकत नाही. चला तर मग वास्तू दोषाचे कारण जाणून घेऊ या.
 
1 घरात सतत पाण्याचा अपव्यय होणे- जसं की घरातील नळातून पाणी गळत राहणे, टाकीमधून पाणी वाहणे वास्तू मध्ये अशुभ मानले आहे. या मुळे चंद्र कमकुवत होतो आणि पैशाचे नुकसान होऊन आरोग्यास त्रास संभवतात.   
 
2 बंद घड्याळ ठेवू नये-घरात बंद असलेल्या घड्याळी नसाव्यात. या मुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि कोणत्याही कामात यश उशिरा मिळते.
 
3 घराचे मुख्य दार नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावे. संध्याकाळी या ठिकाणी उजेड असावा. प्रवेश दारात अंधार असणे अशुभ मानले जाते.
 
4 स्नानगृह किंवा स्वयंपाकघरातील निघणाऱ्या पाण्याचे पाइपचे तोंड उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्वमध्ये होणं वास्तुनुसार शुभ मानतात.
 
5 वास्तू शास्त्रात सुकलेले झाड निराशेचे प्रतीक मानले आहे. हे प्रगतीत अडथळा आणतात. जर आपल्या घरात देखील  झाड लावलेले आहे तर योग्य प्रकारे त्यांची काळजी घ्या.
 
6 स्वयंपाकघराच्या समोर किंवा जवळ स्नानगृह नसावे. हे घरात नकारात्मक ऊर्जेला कारणीभूत असतो. स्वयंपाकघरातील नकारात्मकता आपल्या संपूर्ण घराला त्रासदायी ठरू शकते.  
 
7 घराच्या समोर कोणतेही झाड, विजेचे खांब किंवा मोठा दगड नसावा. या मुळे पैशाचे नुकसान होते आणि नकारात्मकता पसरते.