गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

समृद्ध घरासाठी ..।

वास्तूशास्त्रानुसार संपूर्ण घराचा विचार करताना घराचं मुख्य दार बसवण्यापूर्वी वास्तुची पूजा केली पाहिजे. चांगल्या मुहूर्तावर दार बसवलं पाहिजे. घराचं क्षेत्रफळ एकूण नऊ भागात विभागल्यानंतर दाराची जागा निश्चित करता येते. उजवीकडून चौथ्या भागात आणि डावीकडून सहाव्या भागात दाराची जागा निश्चित करावी. उत्तर आणि पश्चिम दिशेवर लक्ष्मीचा वरदहस्त असतो. पूर्व दिशा सर्वच कारणांसाठी आदर्श मानली जाते. दक्षिण दिशा मुक्तीची मानली जाते. कधीही घराच्या एखाद्या कोपर्‍यात मुख्य द्वार असू नये. इतर दरवाज्यांच्या तुलनेत घराचा मुख्य दरवाजा मोठा असावा. समोरच्या गराचं तोंड थेड आपल्या दाराकडे असेल तर मुख्य दाराची रचना बदलावी. मुख्य दाराचं तोंड कृधीही समोरच्या (असल्यास) पडक्या घराकडे नसावं. मुख्य दाराखाली कोणताही जमिनीखालचा पाण्याचा साठा नसावा. घरासाठी स्वयंचलित दारं वापरू नयेत. 
 
* घराच्या ईशान्य कोपर्‍यात स्वयंपाकघर, बेडरुम किंवा स्टोअर रूम असेल तर ती जागा तातडीनं रिकामी करावी. तिथे देवाचा फोटो लावून पूजाअर्चा करावी. 
 
* घरातील नैऋत्य कोपरा कधीही रिकामा ठेवू नये. तिथे वजनदार सामान ठेवावं. 
 
* स्वयंपाकघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल आणि ते बदलणे शक्य नसेल तर आग्नेय कोपर्‍यात गॅस ठेवून तेथेच स्वयंपाक करावा. 
 
* किचन किंवा डायनिंग रूम घराच्या पश्चिमेकडे असेल तर जेवताना तोंड उत्तर, पश्चिम किंवा पूर्वेकडे असण्याकडे कटाक्ष ठेवावा.