शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

वास्तू देते आनंद

आपले जीवन आनंदी कसे होईल या विषयी वास्तुशास्त्रात काही नियम सां‍गितले आहे. ते पुढील प्रमाणे...

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या घराची पूर्वेकडील सर्व दारे व खिडक्या उघडाव्यात.

सूर्याच्या पहिल्या किरणाकडे बघून आपल्या सुखद भविष्याची कामना करावी.

जर घराच्या पूर्वेकडे एखादी बाल्कनी, टॅरेस किंवा पोर्च असेल तर तिथे सकाळी नियमित योग करावा.

कुठलाही वैदिक विधी करत असताना नेहमी आपले तोड पूर्वेकडे असायला पाहिजे.

दिवसभर घरातील उत्तर, पूर्वोत्तर व पूर्वेकडील सर्व खिडक्यांची पडदे उघडे ठेवावीत. घरात दिवसभर सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरात सर्वत्र आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण होत असते. घराचे वातावरण सुखी समाधानी होतात.