शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (12:38 IST)

वास्तू आण तुमची राशी!

वास्तुशास्त्रासाठी राशींच्या संदर्भात माहिती आवश्यक आहे. आपल्या राशीसाठी काय लाभदायक काय याची माहिती ठेवायला हवी. कोणते तत्व, कोणता रंग, कोणती दिशा लाभदायी आहे, याची माहिती करून घ्या. आकाश मंडळ 360 अंशांचे आहे. ते 12 राशी व 27 नक्षत्रांत विभागले आहे. प्रत्येक राशीत 30 अंश आहेत व प्रत्येक भाग स्वत:ची एक वेगळी आकृती तयार करतो या आकृतीच्या आधारे प्रत्येक राशीला नाव दिले आहे.
 
राशींचे तत्व
पृथ्वी तत्व : वृषभ, कन्या, मकर
जल तत्व : कर्क, वृश्चिक, मीन
अग्नी तत्व : मेष, सिंह, धनू
वायू तत्व : मिथून, तुळ, कुंभ
 
राशीचे रंग
मेष लाल
वृषभ हिरवा
मिथून फिक्कट हिरवा
कर्क लालभडक, पांढरा
सिंह पिवळा
कन्या हिरवा
तूळ नीळा, काळा
वृश्चिक सोनेरी
धनू पिवळा
मकर विटकरी, तांबूस
कुंभ काळा
मीन फिकट पांढरा
 
राशीनुसार मुख्य दाराची दिशा
मीन, कर्क, वृश्चिक : उत्तर
मेष, सिंह, धनू : पूर्व
वृषभ, कन्या, मकर : दक्षिण
कुंभ, तुळ, मिथून : पश्चिम
 
राशी अंकात
पूर्व 1 5 09
दक्षिण 2 6 10
पश्चिम 3 7 11
उत्तर 4 8 12