1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शनिवार, 12 जुलै 2025 (17:57 IST)

Bitter Gourd Pickle हे लोणचं नुकसान नाही करणार, आजच घाला कारल्याचे लोणचे रेसिपी

Bitter gourd pickle
साहित्य-
500 ग्रॅम कारले
अर्धा कप मोहरीचे तेल
चार चमचे पिवळी मोहरी
दोन चमचे जिरे
दोन चमचे मेथीचे दाणे
1/4 टीस्पून हिंग  
एक टीस्पून ओवा
तीन चमचे मीठ
एक चमचा हळद  
अर्धा टीस्पून तिखट
1/4 टीस्पून गरम मसाला
अर्धा टीस्पून बडीशेप पूड
1/4 टीस्पून काळे
कृती-
कारल्याचे लोणचे बनवण्यासाठी सर्वात आधी कारले धुवून स्वच्छ करून घ्यावे. तुमच्या आवडीनुसार कारल्याचे लांब किंवा लहान तुकडे करा. आता एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करावे. आता त्यामध्ये  मोहरी, जिरे, मेथी आणि हिंग घालून परतून घ्या. आता हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि बडीशेप पावडर घालून परतून घ्या. तसेच कढईत चिरलेले कारले घालावे. आता मीठ घालावे. तसेच शिजवून घ्यावे. कारले मऊ झाल्यानंतर पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. थंड झाल्यावर त्यात काळे मीठ घालावे. नंतर लोणचे स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरावे आणि झाकण घट्ट बंद करावे. आता रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊ शकतात. तर चला तयार आहे आपले कारल्याचे लोणचे रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik