चविष्ट मसाला वडा
साहित्य-
1 कप हरभरा डाळ,5 हिरव्या मिरच्या ,1 कप पान कोबी,1 इंच आल्याचा तुकडा,1 चमचा धणेपूड,1 चमचा तिखट,1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा गरम मसाला,1/2 हरभरा डाळीचे पीठ,मीठ चावी प्रमाणे,तेल तळण्यासाठी,कोथिंबीर.
कृती-
मसाला वडा बनविण्यासाठी सर्वप्रथम चणा किंवा हरभरा डाळ चार ते पाच तास भिजत घाला आता मिक्सरमध्ये हिरव्यामिरच्या आणि आलं वाटून घ्या आता भिजत टाकलेल्या चणा डाळीतून अर्ध कप दरीदरीत वाटून घ्या.ही डाळ एका भांड्यात काढून घ्या त्यात अक्खी डाळ देखील मिसळा या मध्ये चिरलेला पानकोबी, मीठ, तिखट,गरम मसाला,कोथिंबीर मिसळा.आता एका भांड्यात हरभरा डाळीचे पीठ घ्या आणि त्यात पाणी घालून घोळ तयार करा.आता या मिश्रणाचे बॉल बनवा.हाताला तेल लावा जेणे करून मिश्रण हाताला चिटकणार नाही.हे बॉल हाताने चपटे करा हरभराडाळीच्या पिठात बुडवून घ्या.आता कढईत तेल तापवायला ठेवा आणि हे तयार वडे तेलात सोडा आणि मध्यम आचेवर सोनेरी तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या.
गरम वडे सॉस सह सर्व्ह करा.