सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 15 मे 2021 (17:09 IST)

फॉलिक ऍसिड देणारे चविष्ट मल्टी धान्य धिरडे

मल्टी ग्रेन म्हणजे मिश्र डाळीचे पीठ. हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आणि पौष्टीक आहे. या पिठापासून बनलेल्या पोळया खाल्ल्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते.अशक्तपणा जाणवत नाही. शरीर देखील सक्रिय राहतं.मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर मानले आहे. लॉकडाऊन मध्ये देखील आपण हे बनवू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.   
 
साहित्य- 
1/4 कप हरभराडाळीचे पीठ, 1/4 कप बाजरीचे पीठ,1/4 कप गव्हाचं पीठ, 1/4 कप पाणी,1 /2 वाटी कोथिंबीर,2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो, 1/4 कप किसलेलं पनीर,1/2 कप अमेरिकन कॉर्नचे दाणे, 1 चमचा शेंगदाणा तेल,चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा तिखट, 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा ,1/2 चमचा हळद.
 
कृती- 
सर्वप्रथम सर्व पीठ चांगल्या प्रकारे एकत्र मिसळून घ्या.या मध्ये हिरव्या मिरच्या ,कांदा,कोथिंबीर,टोमॅटो,अमेरिकन कॉर्न, तिखट, हळद,मीठ आणि  थोडंसं पाणी घालून चांगले मिक्स करून घोळ तयार करा. 
तवा किंवा पॅन तापायला ठेवा. त्यावर थोडंसं तेल घालून  हे घोळ त्यावर पसरवून द्या. दोन्ही बाजूने तेलाचा थेंब घालून शेकून घ्या.मल्टी ग्रेन धिरडे खाण्यासाठी तयार आहे. गरम धिरडे हिरव्या चटणी,दही किंवा सॉस सह सर्व्ह करा.