मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: रविवार, 21 डिसेंबर 2025 (08:00 IST)

हिरव्या मटारपासून बनवा झटपट दोन स्वादिष्ट पाककृती

Pea appe usal
हिवाळ्याच्या दिवसात ताजे हिरवे मटार मुबलक प्रमाणात मिळतात. मटारपासून आपण अनेक चविष्ट पदार्थ बनवू शकतो. मटार हे प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन्सने भरपूर असता.आज आपण मटारच्या या सोप्या पाककृती पाहणार आहोत ज्या तुम्ही  नक्की ट्राय करू शकता.
 
मटार उसळ रेसिपी 
साहित्य-
२ कप हिरवे मटार
१ कांदा
२-३ हिरव्या मिरच्या
ओले खोबरे
कोथिंबीर
पुदीना
गरम मसाला
जीरे
हळद
तेल
मीठ
कृती-
सर्वात आधी खोबरे, कोथिंबीर, पुदीना, मिरच्या ब्लेंड करून हिरवी पेस्ट बनवा. आता गॅसवर कढई ठेऊन त्यात तेल घालावे आता जीरे, मोहरी, कढीपत्ता घालावा. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालावा, व परतवून घ्यावे.आता तयार पेस्ट टाकून मसाले घाला.
मटार घालून परतवून घ्या आता आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवा. तसेच चवीप्रमाणे मीठ घाला. मटार मऊ होईपर्यंत शिजवा. वरून भरपूर कोथिंबीर आणि खोबरे गार्निश करा. तयार उसळ पोळी किंवा भातासोबत नक्कीच सर्व्ह करा. 
 
हिरव्या मटारचे आप्पे रेसिपी 
साहित्य-
१ कप मटार 
रवा किंवा बेसन 
दही
हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
जीरे
मीठ
बेकिंग सोडा
कृती-
सर्वात आधी मटार, मिरची, कोथिंबीर ब्लेंड करून पेस्टमध्ये, रवा किंवा बेसन आणि दही मिक्स करून बॅटर बनवा. आता या बॅटरमध्ये जिऱ्याचा तडका घालावा, आता मसाले घालून आप्प्याच्या साच्यात तेल लावून शिजवा. तयार पौष्टिक आप्पे सॉस सोबत नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik