शनिवार, 22 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2025 (08:00 IST)

नाश्त्यासाठी बनवा हेल्दी रेसिपी Carrot Potato Tikki

Oats Tikki For Weight Loss
साहित्य-
लाल गाजर - दोन किसलेले
कच्चे बटाटे - पाच 
कांदा - एक बारीक चिरलेला 
लसूण - चार पाकळ्या
आले - एक इंच
हिरव्या मिरच्या - तीन 
कॉर्न फ्लोअर - तीन चमचे
ब्रेडक्रंब - दोन चमचे
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
कृती-
सर्वात आधी बटाटे स्वछ धुवा आणि सोलून घ्या आता किसून घ्या. तसेच बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घ्या. किस मधील सर्व पाणी पूर्णपणे पिळून घ्या. त्याचप्रमाणे, गाजर धुवून सोलून घ्या आणि किसून घ्या. गाजर घट्ट पिळून घ्या जेणेकरून पाणी बाहेर येईल. आता एका भांड्यात किसलेले गाजर आणि बटाटे यासह सर्व साहित्य मिसळा. या मिश्रणात तुम्हाला कांदा, लसूण, आले, हिरवी मिरची, कॉर्नफ्लोर, ब्रेडक्रंब आणि मीठ घालावे लागेल. सर्व साहित्य एकत्र करून टिक्कीसारखा आकार तयार करा.
आता एका पॅनमध्ये हलके तेल लावा. तेल गरम झाल्यावर त्यात तयार केलेली टिक्की ठेवा आणि मध्यम आचेवर चांगले तळून घ्या. टिक्की दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत बेक करा. तयार केलेली टिक्की एका प्लेटमध्ये काढा. तर चला तयार आहे आपली हेल्दी अशी गाजर आलू  टिक्की रेसिपी, सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik