मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 10 फेब्रुवारी 2025 (16:37 IST)

सोया टिक्का मसाला रेसिपी

Soya Tikka Masala Recipe
साहित्य-
सोया चंक्स एक कप
तेल
आले लसूण पेस्ट
जिरे एक टीस्पून
टोमॅटो प्युरी एक कप
सिमला मिरची एक कप  
कांदा बारीक चिरलेला
हळद एक टीस्पून
लाल तिखट एक टीस्पून
धणेपूड एक टीस्पून
गरम मसाला एक टीस्पून
भाजलेले बेसन तीन चमचे
चवीनुसार मीठ
अर्धा वाटी दही
लिंबाचा रस
कृती-
सर्वात आधी सोयाचे तुकडे पाण्यात टाका आणि चांगले उकळवा. नंतर ते चांगले शिजल्यावर सर्व सोयाबीनचे तुकडे पिळून घ्या आणि पाणी काढून टाका. आता यानंतर एका भांड्यात दही घ्या. नंतर त्यात भाजलेले बेसन, मीठ, तिखट आणि धणे पावडर घाला. तसेच गरम मसाला घालून मिक्स करावे. यानंतर सोयाबीनचे तुकडे घाला आणि मिक्स करा. आता ते अर्धा तास मॅरीनेट करण्यासाठी सोडा. नंतर पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घाला. तसेच बारीक चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट घालून परतून घ्या. कांदा परतवल्यानंतर त्याच्यात टोमॅटो घाला आणि तेल सुटेपर्यंत शिजवा. नंतर त्यात लाल मिरची, धणेपूड, गरम मसाला घालून मिक्स करावे. आता मॅरीनेट केलेले सोयाबीनचे तुकडे घालावे आणि चांगले मिसळा. यानंतर, आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून थोडी ग्रेव्ही बनवा आणि शिजवा. वरून हिरवी कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली सोया टिक्का मसाला रेसिप, पराठा सोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik