Dharma Sangrah
✕

रोज पोहे-उप्पीट खाऊन कंटाळलात? रव्यापासून बनवा 'हा' कुरकुरीत आणि पौष्टिक नाश्ता

Updated: बुधवार, 10 जून 2026 (15:42 IST)
साहित्य-
रवा (बारीक किंवा मोठा): १ कप
दही: ½ कप (किंचित आंबट असल्यास छान)
बारीक चिरलेला कांदा: १ मध्यम
हिरवी मिरची: २ ते ३ (बारीक चिरलेली)
आले: १ चमचा (किसलेले)
कढीपत्ता: ७-८ पाने (बारीक चिरून)
कोथिंबीर: बारीक चिरलेली
जिरे: १ छोटा चमचा
बेकिंग सोडा: १ चिमूटभर
मीठ: चवीनुसार
तेल: तळण्यासाठी

कृती-
१. मिश्रण तयार करणे: एका मोठ्या भांड्यात १ कप रवा, ½ कप दही आणि चवीनुसार मीठ एकत्र करून घ्या. आता यात थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा तयार करा. हे मिश्रण १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून रवा छान फुलेल.

२. मसाले आणि भाज्या मिक्स करणे: १५ मिनिटांनंतर रव्याचे मिश्रण थोडे सुके वाटल्यास १-२ चमचे पाणी घाला. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे आणि चिमूटभर बेकिंग सोडा घाला. सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या.
 ALSO READ: अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी १० मिनिटांत बनवा कुरकुरीत सोयाबीनचा नाश्ता<> ३. वड्यांचा आकार देणे: हाताला थोडे पाणी किंवा तेल लावून घ्या. पिठाचा छोटा गोळा हातात घेऊन तो गोल करा आणि चपटा करून मधे मेदूवड्यासारखे छोटे छिद्र (होल) करा. पाणी लावल्यामुळे पीठ हाताला चिकटणार नाही.
ALSO READ: अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी
४. कुरकुरीत तळणे: कढईत तेल चांगले गरम करून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि तयार केलेले वडे तेलात सोडा. वडे दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. जर तुम्हाला हा नाश्ता जास्त तेलात तळायचा नसेल, तर याच पिठात भरपूर भाज्या (गाजर, शिमला मिरची) घालून तुम्ही त्याचे 'रवा अप्पे' किंवा तव्यावर कमी तेलात 'धिरडे' सुद्धा बनवू शकता. तर चला गरमागरम, कुरकुरीत आणि पौष्टिक रवा वडा तयार आहे! हा वडा तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: कांदा-बटाट्याची भजी खाऊन कंटाळा आला असेल; भेंडीची कुरकुरीत भजी ट्राय करा
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments