रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (08:30 IST)

मुलांसाठी बनवा चविष्ट कुकीज

मुलांना कुकीज खाणे खूप आवडते.सध्या ते कोरोना मुळे घरातच आहे आणि बाहेरचे काही खाऊ शकत नसल्यामुळे आपण त्यांच्या साठी घरातच कुकीज बनवू शकता.त्यांना खूप आवडेल.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य-
 
1 कप गव्हाचं पीठ,1/2 कप बटर,1/2 कप साखर,1/2 लहान कप दालचिनीपूड,2 मोठे चमचे दूध,1 लहान चमचा व्हॅनिला,1/4 चमचा जायफळपूड.
 
कृती- 

गव्हाच्या पिठात सर्व साहित्य मिसळून कणिक मळून घ्या.या कणकेच्या गोळ्याला लाटून घ्या आणि बटर लावून कुकीजचा आकार द्या.कुकीज ओव्हन मध्ये ठेवून 160 डिग्री सेंटीग्रेडवर 15 मिनिटासाठी बॅक करून घ्या.थंड झाल्यावर खाण्यासाठी द्या.हे कुकीज हवाबंद डब्यात ठेऊन द्या.