रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (20:26 IST)

मधुमेहाच्या रुग्णांसाठी खास घरीच बनवा काजू कतली

साहित्य-
 
1 वाटी बारीक दळलेले काजू,5-6 मोठे चमचे शुगर फ्री, 4-5 केसराच्या कांड्या,1/2 चमचा वेलची पूड,पाणी गरजेपुरते,आणि चांदीचा वर्ख.
 
कृती-
 
एका कढईत पाणी,शुगरफ्री आणि केसरच्या कांड्या घालून पाण्यात शुगरफ्री विरघळे पर्यंत ढवळा.त्यात वेलचीपूड आणि मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर काजूची पूड घाला.आणि ढवळत राहा जेणे करून त्यात गुठळ्या होणार नाही.चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर मंद आचेवर शिजवा.
 
आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.मिश्रण थंड झाल्यावर एका ताटलीत तुपाचा हात लावून मिश्रण ताटलीत एक सारखे पसरवून द्या.वरून चांदीचा वर्ख लावून आपल्या आवडत्या आकारात सुरीच्या साहाय्याने काजू कतली कापून घ्या.घरीच सोप्या पद्धतीने तयार केलेली शुगरफ्री काजू कतली खाण्यासाठी सर्व्ह करा.