Daily Horoscope
✕

नाश्त्यासाठी झटपट, मऊ आणि स्पंजी 'रवा ढोकळा' उत्तम पर्याय

Updated: बुधवार, 29 जुलै 2026 (20:41 IST)
मीठ: चवीनुसार
 
फोडणी आणि सजावटीसाठी:
मोहरी: १ छोटा चमचा
तिळ: १ छोटा चमचा
हिंग: १/४ छोटा चमचा
हिरव्या मिरच्या: २-३ (उभ्या चिरलेल्या)
कढीपत्ता: ८-१० पाने
कोथिंबीर: बारीक चिरलेली
किसलेले ओले खोबरे: २ चमचे (पर्यायी)
 
कृती-
१. पीठ भिजवणे:
एका मोठ्या भांड्यात रवा, दही, साखर, १ चमचा तेल, आले-मिरची पेस्ट आणि मीठ एकत्र करा. त्यात थोडे थोडे पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत असे मध्यम घट्ट (इडलीच्या पिठासारखे) द्रावण तयार करा. हे पीठ झाकून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा, जेणेकरून रवा छान फुलेल.
 
२. वाफवण्याची तयारी:
स्टीमर किंवा कुकरमध्ये २ ग्लास पाणी उकळत ठेवा. (कुकर वापरणार असाल तर शिटी आणि रबर काढून ठेवा). ढोकळा लावायच्या ताटाला किंवा डब्याला आतून तेलाचा हात लावून घ्या.
 
३. ढोकळा वाफवणे:
१५ मिनिटांनंतर पिठात थोडा घट्टपणा आला असेल, तर १-२ चमचे पाणी घालून पीठ योग्य पातळ करा. आता पिठात ईनो किंवा खाण्याचा सोडा घाला आणि त्यावर १ छोटा चमचा पाणी टाका जेणेकरून ईनो ॲक्टिव्हेट होईल. हे पीठ एकाच दिशेने हलक्या हाताने ५-१० सेकंद मिक्स करा (पीठ लगेच हलके आणि फुगीर दिसेल). लगेच हे पीठ तेल लावलेल्या ताटात ओता आणि ताट थोडे टॅप (Tap) करून घ्या. हे ताट उकळत्या पाण्याच्या स्टीमरमध्ये ठेवा आणि झाकण लावून मध्यम ते मोठ्या आचेवर १२ ते १५ मिनिटे वाफवून घ्या. सुरी किंवा टूथपिक ढोकळ्यात खुपसून पहा; ती स्वच्छ बाहेर आली की ढोकळा शिजला असे समजावे. ताट बाहेर काढून ५ मिनिटे थंड होऊ द्या.
 
४. फोडणी देणे:
लहान कढईत १ मोठा चमचा तेल गरम करा. त्यात मोहरी आणि तीळ टाका. तडतडल्यावर हिंग, कढीपत्ता आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. गॅस बंद करा आणि या फोडणीत २ ते ३ चमचे पाणी घाला (पाणी घातल्यामुळे ढोकळा कोरडा पडत नाही आणि मऊ राहतो). वाफवलेला ढोकळा चौकोनी आकारात कापून घ्या आणि ही गरम फोडणी त्यावर सर्वत्र पसरवा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा किस भुरभुरा. गरमागरम आणि मऊसूद रवा ढोकळा पुदिन्याची हिरवी चटणी किंवा गोड-आंबट चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करा!
ALSO READ: गुजराती खमण ढोकळा; हलकी आणि जाळीदार डिश घरीच बनवण्यासाठी सोपी रेसिपी
महत्त्वाच्या टिप्स:
ईनो घातल्यावर घाई करा: ईनो घातल्यानंतर पीठ जास्त वेळ बाहेर ठेवू नका, लगेच वाफवायला ठेवा; नाहीतर ढोकळा फुगत नाही.
फोडणीत पाणी: फोडणीत २-३ चमचे पाणी घातल्यामुळे ढोकळा गळ्यात अडकत नाही व दीर्घकाळ स्पंजी राहतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: मऊ आणि लुसलुशीत ढोकळा घरी बनवण्यासाठी काही खास टिप्स
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: सँडविच ढोकळा; पार्टी किंवा विशेष प्रसंगी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

प्रेरणादायी कथा : सुखी जीवनाचा मार्ग

उरलेल्या मिठाईपासून बनवा नवीन डेझर्ट; दिवाळीनंतर गोड पदार्थांचा असा करा वापर

Swami Samarth names for baby girl श्री स्वामी समर्थांच्या नावावरून मुलींसाठी सुंदर नावे

Childrens day 2026 speech in Marathi बालदिन विशेष भाषण

आवळ्यांपासून घरीच तयार करा बाजारासारखी चविष्ट आवळा कँडी

पुढील लेख
Show comments