संबंधित माहिती
- गुळाचा गोडवा आणि मखान्याचे पौष्टिक गुणधर्म यांचा संगम; Jaggery Makhana Lassi Recipe
- संध्याकाळच्या भुकेसाठी 15 मिनिटांत तयार होणारा गरमागरम शेवयांचा उपमा
- प्रथिनांनी समृद्ध मुलांच्या डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय Black Chana Cutlet Recipe
- लंचसाठी अगदी रेस्टॉरंट स्टाईल पराठासोबत मसालेदार फुलकोबीची सुकी भाजी
- रविवार स्पेशल नाश्त्याला बनवा गरमागरम आणि कुरकुरीत भन्नाट रेसिपी
फक्त १० मिनिटांत बनवा, चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता 'मसाला ब्रेड पोहे'
सकाळच्या घाईगडबडीत फक्त १० मिनिटांत तयार होणारा, चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता म्हणजे 'मसाला ब्रेड पोहे'. आज आपण अत्यंत सोपी आणि झटपट होणारी 'मसाला ब्रेड पोहे' ची रेसिपी पाहणार आहोत जी घरातील सर्वांना नक्कीच आवडेल.
साहित्य-
ब्रेड स्लाईस: ५ ते ६ (बारीक तुकडे केलेले)
कांदा: १ मध्यम (बारीक चिरलेला)
टोमॅटो: १ लहान (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची: १ ते २ (बारीक चिरलेली)
कढीपत्ता आणि कोथिंबीर: आवडीनुसार
मसाले: मोहरी (अर्धा चमचा), हळद (पाव चमचा), लाल तिखट (अर्धा चमचा), मीठ (चवीनुसार)
तेल: २ चमचे
लिंबाचा रस आणि शेव: सजवण्यासाठी
कृती-
सर्वात आधी ब्रेडच्या ५-६ स्लाईस घेऊन त्याचे हाताने किंवा चाकूने छोटे छोटे चौकनी तुकडे करून एका बाजूला ठेवून द्या. आता कढईत २ चमचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाका. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा घालून कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. कांदा परतल्यावर त्यात टोमॅटो टाका आणि मऊ होईपर्यंत परता. आता गॅस बारीक करून हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मसाला चांगला एकत्र करून घ्या. या तयार मसाल्यात ब्रेडचे तुकडे टाका आणि हलक्या हाताने मिक्स करा जेणेकरून मसाला ब्रेडला व्यवस्थित लागेल. वरून हलका पाण्याचा हबका (चितोडा) मारा, कढईवर २ मिनिटे झाकण ठेवून बारीक गॅसवर वाफ काढा. गरम-गरम ब्रेड पोहे प्लेटमध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडा लिंबाचा रस आणि आवडीनुसार बारीक शेव किंवा फरसाण टाकून चहासोबत खायला द्या!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
