बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

Soup Recipe: ट्राय करा नवीन काहीतरी....बटाटा पालक सूप जाणून घ्या रेसिपी

सूप एक आरामदायक आणि आरोग्यादायी रेसिपी आहे. जे अनेकांना मनापासून आवडते. आज आपण बटाटा आणि पालकपासून बनणारी चविष्ट सूप रेसिपी पाहणार आहोत. तर चला लिहून घ्या रेसिपी.
 
साहित्य-
100 ग्रॅम बटाटे साल कडून कापलेले 
30 ग्रॅम कांद्याची पात कापलेली 
50 ग्रॅम बटर 
20 मिली जैतून तेल
300 मिली फुल क्रीम दूध
60 मिली क्रीम
150 ग्रॅम पालक कापलेला 
8 लसूण पाकळ्या-तुकडे करून घ्यावे 
60 ग्रॅम कांदा कापलेला 
1 चमचा ओवा कापलेला 
चिमुभर जायफळ पूड 
मीठ चवीनुसार 
 
कृती-
1. एका पॅन मध्ये तेल गरम करावे. यामध्ये कापलेला कांदा,पात,  ओवा, लसूण घालावे आणि काही मिनिट परतवावे.
 
2. कापलेले बटाटे घालावे, त्यानंतर मीठ घालावे.
 
3. कमीतकमी पाच मिनिटानंतर दूध घालावे आणि गॅस लहान करून वीस मिनिट शिजवावे. 
 
4. आता बटाटे एक स्मूथ सूप कंसिस्टेंसी मध्ये ब्लेंड करावे. 
 
5. चवीसाठी क्रीम आणि जायफल घालावे. 
 
6. पालकाला बटर आणि मसाले लावावे. तयार बटाटा सूप मध्ये पालक मिक्स करून सर्व्ह करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik