शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (11:58 IST)

टरबूज करी

साहित्य- 
1/4 मोठे टरबूज, 2 चमचे तेल, 1 टीस्पून जिरे, 2 टीस्पून आले लसूण पेस्ट, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा लहान चमचा हळद, 1/2 टीस्पून पिसलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून साखर, चवीप्रमाणे मीठ, 2 टीस्पून लिंबाचा रस.
 
भाजी कशी बनवायची-
टरबूजचे मोठ्या 1 इंच चौकोनी तुकडे करा. टरबूज अर्धे वाटून घ्या आणि ब्लेंडरमध्ये अर्धे टाकून प्युरी बनवा.
आता एका मोठ्या कढईत तेल गरम करा. आता जिरे घालून तडतडू द्या.
आता आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
टरबूजाचा रस घाला आणि मध्यम-उच्च आचेवर शिजवण्यास सुरुवात करा. 
तसेच त्यात तिखट, हळद, धणे घालून मिक्स करावे.
आता एक उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर गॅस कमी करा आणि मध्यम आचेवर 10 मिनिटे शिजवा.
तसेच त्यात चिरलेले टरबूज, साखर, मीठ आणि लिंबाचा रस घाला.
ते चांगले मिसळा.
आता मंद आचेवर 5 मिनिटे शिजवा. 
तुमची टरबूज करी तयार आहे. पोळी सोबत सर्व्ह करा.