मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

तिरंगा पनीर सँडविच

trangel sandwich
साहित्य : 250 ग्रॅम फ्रेश पनीर, पाव चमचा चिली सॉस, पाव चमचा टोमॅटो सॉस, दीड चमचा आलं-लसूण पेस्ट, 100 ग्रॅम दही, पाव वाटी बेसन, मीठ, पुदिना चटणी, तिखट, गरम मसाला व चवीनुसार मीठ, सजावटीसाठी कोथिंबीर.
 
कृती : सर्वप्रथम पनीराला तीन भागात कापावे. आता एका भागावर पुदिना चटणी, दूसर्‍या भागावर चिली सॉस आणि तिसर्‍या भागावर टोमॅटो सॉस लावून एकावर एक ठेवावे.
 
एका भांड्यात दही चांगल्या प्रकारे फेटून घ्यावे. नंतर त्यात बेसन, तेल, मीठ, तिखट आणि गरम मसाला घालून घोळ तयार करावा. आता पनीराला या घोळात घालून तव्यावर चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. तिरंगा पनीर सँडविच तयार आहे, याला कोथिंबीरीने सजवून चटणीसोबत सर्व्ह करावे.