साहित्य : अर्धा किलो कांदे, एक चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ, गोडा मसाला, सुपारीएवढी चिंच, मोठ्या लिंबाएवढा गूळ, पाव वाटी शेंगदाण्याचे कूट, सुक्या खोबर्याचा कीस अर्धी वाटी, फोडणीचे साहित्य.
कृती : कांद्याच्या उभ्या फोडी कराव्या. फोडरी करून, त्यावर कांद्याच्या फोडी टाकाव्यात व चांगली वाफ आणावी. एक वाटी पाणी घालावे. नंतर त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ व चिंचेचे पाणी घालावे व तसेच दाण्याचे कूट, तिळाचे कूट व खोबर्याचा कीस घालावा. नंतर भाजी चांगली शिजवावी.