बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (14:08 IST)

नागपंचमी रेसिपी दाल बाफला

श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी आहे. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, भाज्या चिरत नाही, तवा चुलीवर ठेवत नाही, असे काही नियम पाळत असतात. अशात या दिवशी जेवायला काही तरी वेगळं आणि स्वादिष्ट करायला हवं हे ही तेवढंच खरं. मग पाहू या जर तवा वापरायचा नाही तर ह्या नागपंचमीला आपण स्वयंपाकात काय स्वादिष्ट डिश तयार करू शकता...
 
साहित्य: एक किलो गव्हाचे जाडं पीठ, 1 टेबलस्पून दही, मीठ चवीप्रमाणे, तेल (मोहन), सोडा, हळद, 1 वाटी तूर डाळ, फोडणीचे साहित्य.
 
कृती: बाफले बनविण्यासाठी परातीत गव्हाचे जाडं पीठ, दही, मीठ, चिमूटभर सोडा, थोडीशी हळद आणि मोहन टाकून कोमट पाण्याने घट्ट मळून घ्या. लाडू एवढ्या आकाराचे गोळे तयार करून त्यांना 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्या. (उकळलेल्या पाण्यात गोळे टाकून वर येईपर्यंत शिजवू पण शकता.) बाफले बाहेर काढून 5 मिनिटे तसेच राहून द्या. ओव्हन गरम करून किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून बाफले दोन्ही बाजूनी छान शेकून घ्या. आपण बाफले गॅस ओव्हनवर देखील शेकू शकता. बाफले शेकून झाल्यावर थोडे गार होऊ द्या, मग हलक्या हाताने फोडून त्यात भरपूर साजुक तूप घाला. आपल्या आवडीप्रमाणे तूर डाळची आमटी तयार करून त्याबरोबर बाफले सर्व्ह करा.
 
यासोबत आवडीप्रमाणे बटाट्याची सब्जी, लसूण मिरचीची चटणी, कोथिंबीरीची चटणी, लाडू आणि ताक देखील सर्व्ह केलं जातं.