न्यूट्रिशस सॅलड
MH News
MHNEWSसामुग्री: एक छोटे सफरचंद, अर्धे पेरु, तीन-चार संत्र्याच्या फोडी, एक छोटी ढोबळी मिरची, एक गाजर, एक पान सेलवी दांडी, एक काकडी, तीन-चार बेदाणे, पाच-सहा स्कूप पपई व खरबूज, पाव कप गाईचे दूध (दह्यासाठी), कांदा, हिरवी मिरची, मोहरी पावडर, साखर, मीठ.
कृती: सफरचंद आणि पेरुच्या सालीसकट फोडी कराव्या. त्यात खरबूज व पपई घालावी. त्यात संत्र आणि बेदाणे घालावे. एक गाजर किसून काकडीच्या फोडी, ढोबळी मिरची बारीक चिरुन व सेलरीचे पान चिरुन घालावे. पाव कप गाईच्या दुधाच्या दह्याचा चक्का घ्या. त्यात एक चमचा कांदा चिरुन, पाव चमचा मोहरी पावडर फेटून आणि चवीला हिरवी मिरची पेस्ट, मीठ व पाव चमचा साखर घाला. या तयार ड्रेसिंगमध्ये वरील फळे व भाज्या घाला. गार करुन खायला द्या. यामधून जीवनसत्त्व 'अ' व 'क' मिळते. उत्तम रेषायुक्त तसेच प्रथिने व कॉल्शियमयुक्त आहे.
निरोगी व स्वस्थ शरीर ठेवण्यासाठी व्यायामाबरोबरच नैसर्गिक जीवनसत्व उपलब्ध करुन देणार्या पदार्थांचा आस्वाद घेणे गरजेच असते. जीवनसत्व देणारा हा खाद्यप्रकार अनुभवलाच पाहिजे.
(महान्यूज)
