1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

पौष्टिक ओट्सचा उपमा

पौष्टिक ओट्सचा उपमा
साहित्य: पाऊण वाटी ओट्स, चिमूटभर मोहरी, १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, आवडीप्रमाणे १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , १/२ चमचा काळा मसाला, मीठ चवीनुसार, आवडीनुसार कडिपत्ता, १-२ चिमूट हळद
१ छोटा चमचा तेल, १ पेला पाणी.

कृती: सर्वप्रथम ओट्स कोरडेच भाजून घेऊन बाजूला ठेवावेत. मग तेल तापवून त्यात, मोहरी कांदा, मिरची, कडिपत्ता चांगले परतून घ्यावे. हळद घालून आणखी परतावे. मग त्यात पाणी घालून चांगली उकळी येऊ द्यावी. त्यात काळा मसाला, मटार घालून उकळू द्यावे. मग यात ओट्स घालावेत. ओट्स घालताना सतत हलवत रहावे अन्यथा कढईला चिकटण्याची शक्यता असते. यावर झाकण ठेऊन शिजवावे. अधून मधून हलवत रहावे. पाणी पूर्ण आटून द्यावे. अशाप्रकारे ओट्सचा पौष्टिक उपमा तयार.