कृती : पालकाला स्वच्छ धुऊन उकळून त्याचे पाणी काढून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी. फणसाच्या तुकड्यांना उकळून त्यांना बदामी रंगावर तळून घ्यावे. कांदे, लसणाचे पेस्ट करावे. टोमॅटोला गरम पाण्यात 3-4 मिनिट टाकून सालं काढून घ्यावे. हळद, धणे पूड व तिखट 2 चमचे पाण्यात भिजत घालावे. लवंग व आलं यांचे पेस्ट करून घ्यावे.
एका भांड्यात तेल गरम करून त्यात वेलची, हिंग, तमालपत्र यांची फोडणी घालून कांद्याची पेस्ट परतून घ्यावी. नंतर भिजत घातलेला मसाला त्यात परतावा.
मसाला छान परतून झाल्यावर त्यात टोमॅटो व दही टाकून 5 मिनिट शिजवावे. नंतर त्यात पालक, मीठ व मिरे पूड घालून 2 मिनिट परतावे. फणस टाकून 1/2 कप पाणी त्यात घालून 5 मिनिट झाकण ठेवून शिजवावे. लवंग पूड घालून सर्व्ह करावी.