करावयाची कृती: बटाटे उकळवून सालं काढून मॅश करून घ्या. मुगाची डाळ उकळवून वाटून घ्या. बटाटे आणि मुगाची डाळ एका ताटात एकत्र करून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, मिरची टाका. त्यात 5-6 ब्रेड पाण्यात बुडवून हाताने त्यातील पाक्णी काढून टाकून टाका. कोथिंबीर टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या.
कढईत तेल गरम करा. तयार मिश्रणाचे गोळे बनवून त्या गोळ्यात मनूके ठेवा. हलक्या हाताने दाबून गरम तेलात गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या.
एका पातेलीत दही टाकून फेटा. थोडे पाणी टाका. मीठ आणि साखर टाका. आवडत असेल तर काळे मीठ टाका. तयार केलेले वडे पाण्यात टाकून हलक्या हाताने दाबून दह्यात बुडवून प्लेटमध्ये सजवा. थोडे दही वड्यांवर टाका. वरून त्यात जिरे, लाल तिखट, कोथिंबीर टाका. चिंचेची आंबट-गोड चटणी तयार करा.