शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

मोड आलेले मेथीदाणे

साहित्य : 200 ग्रॅम मेथीदाणा, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा धणे पूड, मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा मोहरी, फोडणीसाठी 2 चमचे तेल. 

कृती : सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी देऊन कांदा परतून घ्यावा नंतर त्यात हळद, तिखट, धनेपूड व मीठ घालून मोड आलेले मेथीदाणे टाकून झाकण ठेवायला पाहिजे. मधून मधून हालवत राहावे. दाणे शिजल्यावर त्यात कोथिंबीर व लिंबाचा रस टाकून पोळी सोबत सर्व्ह करावे.