बुधवार, 1 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

राजगिरा कचोरी

राजगिरा कचोरी
WD
साहित्य : पाव किलो राजगिरा पीठ, ४ बटाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाण्याचे कूट, जिरा, तिखट, मीठ.

चटणीसाठी : ओला खोबरा, कोथिंबीर, हिरवी मिरची.

कृती : सर्वप्रथम बटाटे उकळून घ्या. हिरवी मिरची, कोथिंबीर मिक्सरला वाटून घ्या.बटाटा सोलून, मिरची कोथिंबीर पेस्ट, शेंगदाणा कूट, मीठ, तिखट सर्व एकत्र करून त्यात राजगिरा पीठ मिसळावे. सर्व पदार्थ मिसळताना थोडे पाण्याचे साह्य़ घेऊन घट्ट पीठ तयार करा. छोटे-छोटे गोळे करून कचोरीच्या आकाराचे हातावर थापून घ्या. उकळत्या तेलात खुसखुशीत तळून घ्या. चटणीसाठी ओला नारळ, कोथिंबीर, मिरची एकत्र बारीक वाटून गरमागरम खमंग कचोरीबरोबर सव्‍‌र्ह करा.