साहित्य : दाण्याचे कूट दोन वाट्या, बारीक चिरलेला लसूण दोन चमचे, कोथिंबीर पाव वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी, दूध दीड वाटी, तिखट चार चमचे, दोन-तीन हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ.
कृती :
१. दाणे खमंग भाजून सालासकट जरा भरड कूट करून घ्यावे.
२. थोडे जास्त तेल घेऊन नेहमीप्रमाणे खमंग फोडणी करावी.
३. हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकाव्यात. लगेच लसूण घालून थोडे परतावे.
४. नंतर टोमॅटो घालावा. थोडे परतून लाल तिखट घालावे. (आवडीप्रमाणे तिखट कमी-जास्त करावे.)
५. आता दाण्याचे कूट घालून थोडेसे परतावे. नंतर दूध घालून एक-दोन मिनिटे सतत परतावे.
६. बाजूने तेल सुटू लागले की मीठ आणि कोथिंबीर घालून आच बंद करावी.
७. प्लेटमध्ये कांद्याच्या रिंगा, लिंबू ठेवून सजवून सर्व्ह' करावे.